मेंढ्या चाेरणारी आंतरराज्यीय टाेळी जेरबंद

editor 1 Min Read
1 Min Read

मेंढ्या चाेरणारी आंतरराज्यीय टाेळी जेरबंद

धुळे (ब्युराे चीफ) – जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मेंढ्या चोरीच्या घटनांनी मेंढपाळ समाजामध्ये दहशत निर्माण झाली होती. गत महिन्यात शिंदखेडा तालुक्यात ६१ मेंढ्या चोरी गेल्याची घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. या घटनेचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने राजस्थान येथील राजू बंजारा यास संशयावरून ताब्यात घेत, अधिक चौकशी केली असता, त्याने आपल्या सहकाऱ्यांसह चोरी केल्याचे समोर आले.

पथकाने तत्काळ राजस्थान गाठत ६ संशयितांना ताब्यात घेत चोरीत वापरलेली इनोव्हा कारसह मोबाईल व ३ लाख २४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस उपनरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, संजय पाटील, संदिप सरग, प्रकाश सोनार, कुणाल पानपाटील, रविकिरण राठोड, उमेश पवार, विशाल पाटील, पंकज खैरमोडे, महेंद्र सपकाळ, अमोल जाधव, सुनील पाटील, कैलास महाजन, गुलाब पाटील यांच्या पथकाने केली.

Share This Article
Exit mobile version