आठ दिवसापूर्वीच जिल्हा पणन अधिकारी पदावरून सेवानिवृत्त; आता राजकारणात उडी!

admin 1 Min Read
1 Min Read

– मारोतराव काकडे यांचा सपत्नीक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश!
– वरदडी जिल्हा परिषद गटातून पत्नीला निवडणूक रिंगणात उतरवणार!

बुलढाणा (बाळू वानखेडे) – जिल्हा पणन अधिकारी मारोतराव काकडे हे दि. ३१ ऑक्टोबररोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी आता राजकारणात उडी घेतली असून, पत्नीसह आज, दि. १० नोव्हेंबररोजी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश घेतला. सिंदखेडराजा तालुक्यातील वरदडी जिल्हा परिषद गटातून ते त्यांच्या पत्नी मिनाताई काकडे यांना मैदानात उतरवणार असल्याची माहिती मिळाली आहे.

बुलढाणा येथे जिल्हा पणन अधिकारी म्हणून मारोतराव काकडे कार्यरत होते. त्यांच्याकडे अकोलासह वाशिम जिल्ह्याचादेखील जिल्हा पणन अधिकारी पदाचा प्रभार होता. दरम्यान, नियत वयोमानानुसार, दि. ३१ ऑक्टोबर रोजी मारोतराव काकडे हे जिल्हा पणन अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. आज दि. १० नोव्हेंबररोजी बुलढाणा येथील पक्षाच्या एका कार्यक्रमात मारोतराव काकडे यांनी पत्नी तथा वडाळी गावच्या माजी सरपंच सौ. मिनाताई काकडे व कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. नाझेर काझी, सिंदखेडराजाचे आमदार मनोज कायंदे, जेष्ठ नेते नरहरी गवई यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. सिंदखेडराजा तालुक्यातील वरदडी जिल्हा परिषद गट ओबीसी महिलेसाठी राखीव असून, येथून मारोतराव काकडे हे त्यांच्या पत्नी सौ मिराताई काकडे यांना निवडणूक रिंगणात उतरवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे त्यांचा राजकीय प्रवास कितपत यशस्वी होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Share This Article
Exit mobile version