– अनैतिक संबंधांच्या संशयातून पती-पत्नीचे भांडण विकोपाला गेले; सुदैवाने पत्नी बचावली!
– चिखली पोलिसांत गुन्हा दाखल, कसून तपास सुरू!
चिखली (राजेश लोखंडे) – सततचा कौटुंबिक वाद आणि अनैतिक संबंधाच्या संशयावरून नवरा-बायकोतील वाद विकोपाला गेल्याने, या वादातून चिखली शहर युवक काँग्रेसचा अध्यक्ष विशाल काकडे याने त्याच्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने पत्नी नमिता काकडे यांनी समयसूचकता दाखवत पेटलेली साडी पाण्याने भिजवून स्वतःचा जीव वाचविला. या घटनेने चिखली शहरात एकच खळबळ उडालेली आहे.
या प्रकरणी नमिता काकडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून चिखली शहर पोलिसांनी विशाल काकडे याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच, पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, अनैतिक संबंधाच्या संशयातून ही घटना घडल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी विशाल आणि पत्नी नमिता यांच्यात सुरुवातीला कौटुंबिक कारणातून जोरात वाद झाला. पत्नी-पत्नी यांच्यामध्ये बाचाबाची सुरू असतानाच फोन आला. विशाल यांना एका महिलेचा फोन आला होता. पत्नीने फोन कुणाचा आला? असा जाब विचारला. त्यावर विशाल यांना राग अनावर झाला. संतापलेल्या विशाल यांनी पत्नीला बेडरूममध्ये नेले व अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. मात्र नमिताने समयसूचकता दाखवत तात्काळ पेटलेली साडी पाण्याने भिजवली व आपला जीव वाचवला. त्यानंतर पत्नीने थेट पोलिस स्टेशन गाठले अन् गुन्हा दाखल केला. चिखली पोलिसांनी याप्रकरणी विशाल यांच्यासह आणि दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.
सौ. नमिती विशाल काकडे (वय २९) यांच्या तक्रारीवरून चिखली पोलिसांनी विशाल उर्फ रिक्की काकडे याच्याविरोधात गुन्हे दाखल केले असून, त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. पती विशाल, रेखा काकडे, भावना नकवाल, तीनही रा. जुनागाव, चिखली यांनी ९ नोव्हेंबरच्या ८ वाजेपासून ते रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास सासू रेखा काकडे व नणंद भावना नकवाल यांनी आरोपी विशालला पत्नीत जीवे ठार मारण्याची चिथावणी दिली. त्यामुळे पती विशालने घरातील प्लॅस्टिक बॉटलमधील पेट्रोल अंगावर टाकून घरातील गॅस सुरू करून दिला व पेटवून दिले. याबाबत रात्री पोलिसात तक्रार देण्यासाठी पीडिता नमिता काकडे यांच्यासह त्यांचे कुटुंबीयदेखील हजर होते. याप्रसंगी रिक्की काकडे याने मुलीला दिलेल्या त्रासाचा पाढाच नमिता यांच्या वडिलांनी पत्रकारांपुढे वाचला होता.

