सवडद येथील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचा अपघाती मृत्यू!

admin 1 Min Read
1 Min Read

– कोराडी नदीवरील कट्ट्यात पाय घसरून पडले; शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!

साखरखेर्डा (प्रतिनिधी) – सवडद येथील जानराव वामनराव देशमुख (वय ७८) हे शेतात गेले असता, त्यांचा पाण्याच्या कट्ट्यात पाय घसरून पडल्याने त्यांचा मृत्यू झाला.

सवडद येथील ग्रामपंचायतीमध्ये अनेक वर्ष काम करुन ते वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर त्यांनी शेतात लक्ष घालून जोड व्यवसाय म्हणून म्हशी खरेदी केल्या. ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता ते शेतावर गेले. म्हशींना चारापाणी करुन ते परत येत असताना कोराडी नदीवरील एका कट्यावरुन चालत येत असताना त्यांचा पाय घसरला आणि ते कट्ट्यात पडले. त्यांना पोहन येत नसल्याने त्यांचा पाण्याच्या कट्ट्यात मृत्यू झाला. आज, दि. ९ नोव्हेंबररोजी सकाळी अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या अपघाती निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Share This Article
Exit mobile version