खेड तालुक्यात सामूहिक राष्ट्रगीत उत्साहात

editor 1 Min Read
1 Min Read

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यानिमित्त शासन निर्णया प्रमाणे बुधवारी ( दि. १७) सकाळी ११ वाजता खेड तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, संस्था, सार्वजनिक ठिकाणे, शाळा, महाविद्यालये, आस्थापना या ठिकाणी तसेच यावेळी जिथे आहे, तिथे उभे राहून एकाच वेळी नागरिकांनी राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम देशभक्तीमय वातावरणात झाला.

खेड तहसीलदार कार्यालयात तहसीलदार वैशाली वाघमारे यांचे सह सर्व कर्मचारी, पदाधिकारी,  सेवाभावी संस्थाचे सदस्य आदींचे उपस्थितीत राष्ट्रगीत गायन पार पडले.  यावेळी खेड तालुका समितीचे अध्यक्ष प्रकाश पाचारणे यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version