‘बुलढाणा अर्बन’चे देऊळगाव साकरशा शाखा व्यवस्थापक गणेश आडे यांचे आकस्मीक निधन!

admin 1 Min Read
1 Min Read

– उद्या सकाळी मोहना बु.येथे अंत्यसंस्कार!

मेहकर (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील देऊळगाव साखरशा येथील बुलढाणा अर्बन को.ऑप. सोसायटीचे शाखा व्यवस्थापक गणेश जानकीराम आडे यांचे आज, दि. ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेदरम्यान निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या, रविवारी, दि. ९ नोव्हेंबररोजी सकाळी तालुक्यातील मोहना बु.येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मोहना बु.येथील शिवसेना शिंदे गटाचे जेष्ठ कार्यकर्ते सुरेश जानकीराम आडे यांचे ते मोठे भाऊ होते.

राज्यासह परराज्यातही नावलौकिक असलेल्या बुलढाणा अर्बन को-ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीची तालुक्यातील देऊळगाव साखरशा येथे शाखा कार्यरत आहे. सदर शाखेतील शाखा व्यवस्थापक गणेश आडे (वय ५०) हे आज ८ नोव्हेंबर रोजी बुलढाणा अर्बन सोसायटीच्या देऊळगाव साकरशा शाखा कार्यालयात कामकाज करत असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात नेले असता, मृत घोषित करण्यात आले. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाला असल्याचे सांगितले जात असले तरी नेमका मृत्यू कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच समजेल. त्यांचे पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊसह बराच मोठा आप्त परिवार आहे. दरम्यान, मृतक गणेश आडे यांच्या पार्थिवावर उद्या, दि. ९ नोव्हेंबर रोजी सकाळी तालुक्यातील मोहना बु.येथे मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. एक कार्यतत्पर कर्मचारी म्हणून परिचित असलेले गणेश आडे यांच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Share This Article
Exit mobile version