धाड परिसरात चोरटयांचा धुमाकूळ

editor 1 Min Read
1 Min Read

बुलडाणा -तालुक्यातील धाड पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या कुंबेफळ, सातगाव या दोन गावातून 12 जुनच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी 5 शेतकऱ्यांच्या गोठ्यातील 6 लाख 50 हजारांची आठ जनावरे लंपास केली आहे. या घटनेने शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून मौल्यवान पशुधन चोरीच्या घटना या भागात वाढल्यामुळे शेतकरी ऐन पावसाळयाच्या तोंडावर मोठया आर्थिक अडचणीत सापडला आहे.

धाड नजिकच्या कुंबेफळ येथील शिवाजी बाळाजी आघाव यांनी धाड पोस्टे.ला फिर्यादीत त्यांच्या शेतातील 2 बैल तसेच सुखदेव म्हसाजी वाघ यांच्या 2 वासऱ्या, फकीरखाँ पठाण यांचा एक बैल, राजु वाघ यांचे दोन बैल तर सातगाव येथील गोपाल राजपूत यांची गीर जातीची गाय असे एकूण 6 लाख 50 हजाराचे पशुधन चोरट्यांनी लंपास केल्याच्या फिर्यादीवरुन धाड पोलिसांनी अज्ञात चोरटयाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. परंतु वारंवार या भागात पशुधन चोरीच्या घटना तथा शेतकऱ्यांची होणारी फसवणूक या घटना पोलीस प्रशासनाला मोठे आव्हान ठरत आहेत. धाड परिसरात मोठया प्रमाणात छोटया मोठया चोरीच्या घटना घडल्या आहेत मात्र त्या चोऱ्यांचा तपास पोलिस प्रशासन लावू न शकल्याने शेतकरी वर्गातून रोष व्यक्त केल्या जात आहे.

Share This Article
Exit mobile version