प.पू.प्रल्हाद महाराज संस्थानच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १ लाख ५१ हजारांची मदत!

admin 1 Min Read
1 Min Read

साखरखेर्डा (अशोक इंगळे) – येथील गोविंद रामानंद समर्थ सद्गुरु श्री प्रल्हाद महाराज संस्थानच्यावतीने अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १ लाख ५१ हजार रुपये मदतीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला.

नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा पक्ष संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीला भाजपा प्रदेश सदस्य तथा गोविंद रामानंद समर्थ सद्गुरु श्री प्रल्हाद महाराज संस्थानचे उपाध्यक्ष रावसाहेब देशपांडे हेही उपस्थित होते. या बैठकीत रावसाहेब देशपांडे यांनी संस्थानच्यावतीने अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी संस्थेच्या वतीने १ लाख ५१ हजार रुपये मदतीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुपुर्द केला. यावेळी चिखली मतदार संघाच्या आमदार श्वेताताई महाले पाटील, रावसाहेब देशपांडे, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अंकुर देशपांडे उपस्थित होत. यावर्षी अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर क्षेत्र बाधित झाले. शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले, त्यांना शासनाच्या वतीने मदत मिळत आहे. परंतु, यात आपला खारीचा वाटा उचलावा म्हणून महाराष्ट्रातील अनेक धार्मिक संस्थांनी पुढे येऊन मदत केली. त्या अनुषंगाने साखरखेर्डा येथील श्री प्रल्हाद महाराज संस्थानच्या वतीने सुध्दा मदत करण्याचा निर्णय घेतला होता. ती मदत देण्यात आली.

Share This Article
Exit mobile version