गिरजाबाई काकडे यांचे निधन

admin 1 Min Read
1 Min Read

– उद्या वडाळी येथे रक्षा विसर्जन

सिंदखेडराजा – वडाळी (ता. सिंदखेडराजा) येथील गिरजाबाई कारभारी काकडे (वय ७५ वर्षे) यांचे काल, दि. २३ ऑक्टोबररोजी दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्या अत्यंत संयमी, मनमिळावू आणि ममतेच्या मूर्त स्वरूप होत्या. त्यांचा अंत्यविधी दिनांक २४ ऑक्टोबररोजी वडाळी येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात पार पडला. नातेवाईक, ग्रामस्थ, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना अखेरचा निरोप दिला. त्यांचा रक्षा विसर्जन कार्यक्रम दिनांक २५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता वडाळी येथे आयोजित करण्यात आला असून, सर्व नातेवाईक, ग्रामस्थ व मित्रपरिवारांना उपस्थित राहण्याचे आवाहन काकडे परिवाराकडून करण्यात आले आहे.
——

Share This Article
Exit mobile version