जांभीपाडा येथे अचानक आलेल्या पुरात दोन युवक बेपत्ता; एकाच्या मृतदेह आढळला

editor 1 Min Read
1 Min Read

नंदूरबार (जिल्हा प्रतिनिधी) –  जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस होत असल्याने अनेक छोटे मोठे नदी-नाल्यांना पूर आल्यासारखी  परस्थिती निर्माण होत आहे.  नंदुरबार तालुक्यातील जांभीपाड्यातील दोन युवक मासेमारी करण्यासाठी गेले असता ते परतले नसल्याने गावातील लोकांनी त्यांना शोधाशोध केली. मात्र ती मिळून आले नसल्याने गावातील नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे.

जांभीपाडा गावातील गुरुदीप दिलीप पाडवी (वय २८) व गणेश मोतू पाडवी (वय ४०) हे १५ ऑगस्ट रोजी गावाजवळच्या एका नाल्यात मासेमारीसाठी गेले होते.  नाल्याला आलेल्या अचानक पुराने हे दोघेही वाहुन गेले होते.  काल रात्रीपासून त्यांच्या शोध घेतला जात होता मात्र आज सांयकाळी उशीरा यातील गुरुदीप याचा मृतदेह नाल्याच्या नदी संगम ठिकाणी आढळुन आला असून,  गणेश पाडवी यांचा शोध अद्यापी सुरु आहे.

Share This Article
Exit mobile version