– पुण्यतिथीनिमित्त स्व. भास्कराव शिंगणे यांना अभिवादन करण्यासाठी लोटली गर्दी!
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, सहकारमहर्षी स्व.भास्करराव शिंगणे यांची आज, दि. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी स्मृती ज्योत निघाली असता, ठीकठिकाणी अभिवादन करण्यात आले.
१९७० ते १९९२ या दोन दशकांत सहकार चळवळ बुलढाणा जिल्ह्यात राबवून सहकाराचे सक्षम जाळे निर्माण केले होते. बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मार्वेâटिंग फेडरेशनचे अध्यक्ष या सारख्या महत्त्वाच्या पदावर काम करीत असताना स्व.भास्करराव शिंगणे यांनी साखरखेर्डा येथे पैनगंगा सहकारी सुतगिरणी, भगिरथ सहकारी खत कारखाना, अनेक सहकारी सुत गिरण्या उभ्या करण्यासाठी केलेली मदत आजही त्यांच्या कार्याची दखल घेतली जाते. १९८० साली सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार असताना केलेली विकासकामे आजही स्मरणात राहील, अशी आहेत. त्यांचे १९९२ साली अकाली निधनानंतर सहकार लॉबी खिळखिळी झाली. परंतु, त्यांच्या कार्याची आठवण म्हणून सिंदखेडराजा येथील जिजाऊ माँसाहेब यांच्या जन्मस्थळापासून दरवर्षी ११ ऑक्टोबररोजी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीज्योत काढण्यात येते. ३३ वर्षे झाली तरी या नेत्यांच्या आठवणी आजही जनमाणसात घर करून आहेत. सकाळी सहा वाजता मातृतीर्थ सिंदखेडराजा येथून स्मृतीज्योत निघाली असता किनगावराजा, दुसरबीड, बिबी , मलकापूर पांग्रा, शेंदुर्जन, साखरखेर्डा, शिंदी, मेरा बु., चिखलीमार्गे बुलढाणा येथे समाधीस्थळी पोहचली. यावेळी शेंदुर्जन येथे माजी कृषी सभापती दिनकरराव देशमुख, सरपंच संतोष शिंगणे, साखरखेर्डा येथे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. विकास मिसाळ, चिखली तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा इसरूळचे सरपंच सतिश पाटील भुतेकर, सरपंच सौ. ज्योती अमित जाधव, ठाणेदार गजानन करेवाड, माजी सरपंच दाऊद कुरेशी, माजी सरपंच कमलाकर गवई, ग्रामसेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष ललित अग्रवाल, सभापती अनिल तुपकर, उपसरपंच संग्रामसिंह राजपूत, माजी उपसरपंच सय्यद रफीक, इब्राहिम शहा, रामदाससिंग राजपूत, तोताराम ठोसरे, दामोधर लांबाडे, ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे विशेष प्रतिनिधी अशोक इंगळे, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख दिलीप खंडारे, विलास आबा रिंढे , माजी सभापती राजू ठोके, साहेबराव काटे महाराज, माजी उपसभापती सुनील जगताप, सुरेश तुपकर, शिवाजी काटे, बबनराव रिंढे, व्यंकटराव रिंढे, अशोक रिंढे, विनायक गायकी, जिजामाता विद्यालयाचे सचिव पंजाबराव हाडे, भाजपचे प्रदेश सदस्य रावसाहेब देशपांडे, संतोष दसरे, मुख्याध्यापक शिवशंकर मखमले, रमेश ठोसरे, मनोहर बुंधे, राजेंद्र लोढे, कोडूंबा जाधव, संपतराव दसरे, सुधाकर पर्हाड, श्रीकांत पर्हाड, बंगाळे सर , तथा जिजामाता विद्यालय, एसईएस ज्युनिअर कॉलेज, श्री शिवाजी हायस्कूल यांनीसुध्दा अभिवादन केले.