ऑनररी कॅप्टन आप्पासाहेब नलवडे यांचे निधन

editor 1 Min Read
1 Min Read

कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी) – शहरातील मंगळवार पेठ, मंडलिंक वसाहत येथील ऑनररी कॅप्टन आप्पासाहेब शिवराम नलवडे (वय ८५) यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. १९७१ च्या भारत – पाक युध्दात अशोक पिकेटवर तिरंगा ध्वज फडकाविण्यात त्यांच्या युनिटचे मोलाचे योगदान होते. त्यांना देशाबद्दल नितांत अभिमान, गर्व होता.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहिल्यावरच त्यांनी मंगळवारी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे मूळ गाव बुधलमुख पांगिरे (ता.चिक्कोडी) हे असून त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुले, सुना, मुलगी, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी दि.१७ रोजी सकाळी ८ वाजता आहे.

Share This Article
Exit mobile version