– नैसर्गिक आपत्तीच्या मदतीसाठी तात्काळ ई-केवायसी करून घ्यावी – तहसीलदार मडके
मेहकर (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील २७३४ शेतकर्यांनी अद्यापही ई-केवायसी केली नाही. तरी नैसर्गिक आपत्तीची मदत मिळण्यासाठी सदर शेतकर्यांनी तात्काळ ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार नीलेश मडके यांनी केले आहे.
मेहकर तालुक्यात जून महिन्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला. सदर पावसामुळे पिकाचेही मोठे नुकसान झाले. सदर नुकसानीसाठी शासनाने जाहीर केलेल्या नैसर्गिक आपत्ती मदतीचे वाटप सध्या सुरू आहे. परंतु तालुक्यातील २७३४ शेतकर्यांनी अद्यापही आपली ई-केवायसी केलेली नाही, त्यामुळे सदर शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर अतिवृष्टीची मदत आपले बँक खात्यात जमा होण्यासाठी संबंधित शेतकर्यांनी तात्काळ आपली ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार नीलेश मडके यांनी केले आहे. विशेष म्हणजे, ई-केवायसी बाकी असलेल्या शेतकर्यांची यादीसुद्धा त्यांनी प्रसिद्ध केली आहे.

