जिल्ह्यात ५५ उमेदवारांना मिळाली अनुकंपा तत्वावर नोकरी

admin 2 Min Read
2 Min Read

– पालकमंत्री डॉ. भोयर यांनी दिले शासकीय नोकरीचे आदेश

वर्धा (प्रकाश कथले) – शासकीय सेवेत असताना एखाद्या कर्मचार्‍याचे अचानक निधन झाल्यानंतर कुटुंबातील सदस्यास अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळविण्यासाठी अनेक वर्ष वाट पाहावी लागत होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धोरणात बदल केल्याने जिल्ह्यातील ५५ कुटुंबांना आज न्याय मिळाला. त्यांना अनुकंपा तत्वावर नियुत्तäया देण्यात आल्यात.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात अनुकंपा तत्वावरील उमेदवार तसेच राज्य लोकसेवा आयोगाद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्याहस्ते नियुक्ती आदेश देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी, पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश खताळे, तहसीलदार अनिकेत सोनवणे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मुंबई येथून या कार्यक्रमाचे दूरदृष्यप्रणालीद्वारे प्रसारण करण्यात आले. संपूर्ण राज्यात आज १० हजार ३०९ उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यात ५ हजार १८७ अनुकंपा तत्वावरील नियुत्तäयांचा समावेश आहे. वर्धा जिल्ह्यात अनुकंपा तत्वावरील गट ‘क’ ३०, गट ‘ड’ २५ तर लोकसेवा आयोगाद्वारे निवडलेल्या ३९ अशा ९४ उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले. अनुकंपा नियुक्तीची प्रक्रिया आधी खूप किचकट होती. नियुत्तäया देतांना विविध प्रकारच्या अडचणी येत होत्या. कुटुंबातील कर्ती व्यक्ती अचानक गेल्याने त्या कुटुंबाचे दु:ख काही प्रमाणात का होईना कमी करता आले पाहिजे, यासाठी धोरणात बदल करण्यात आले. त्यामुळेच राज्यात आज एकाच दिवशी हजारो उमेदवारांना नियुत्तäया देता आल्या, असे पुढे बालतांना पालकमंत्री डॉ भोयर म्हणाले. जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना अनुकंपा नियुक्तीसाठी राज्य शासनाचे अतिशय चांगले धोरण आणले आहे. त्यामुळे तातडीने नियुत्तäया मिळून कुटुंबावरील संकट कमी होण्याचे प्रयत्न होत आहे. शासकीय नोकरीमुळे कुटुंबाला आधार मिळतो, असे सांगितले. पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांनी शासकीय नोकरी कुटुंबाचे जीवनमान सुरक्षित करणारी असते. उमेदवारांनी नोकरीत आल्यानंतर सर्वसामान्य जनतेचे कल्याण, समाधान कसे होईल यादृष्टीने काम करावे, असे सांगितले. यावेळी पालकमंत्र्यांच्याहस्ते अनुकंपा व लोकसेवा आयोगाद्वारे निवड झालेल्या काही उमेदवारांना आदेश देण्यात आले. यावेळी अनुकंपा नियुक्ती मिळालेल्यानी व्यक्त केलेल्या मनोगताची चित्रफित यावेळी दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे संचलन नायब तहसीलदार अतुल रासपायले यांनी केले. यावेळी नवनियुक्त उमेदवार आणि त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version