कामक्षा देवी महाविद्यालयाचा शुभम शिरसाठची विशु स्पर्धेत राज्यस्तरावर निवड

admin 1 Min Read
1 Min Read

– छत्रपती संभाजीनगर येथील राज्यस्तरीय स्पर्धेत करणार अमरावती विभागाचे प्रतिनिधीत्व!

किनगावराजा (शिवम नागरे) – महाराष्ट्र राज्य क्रीडा संचलनालय पुणे यांच्यामार्फत आयोजित विभागीय स्तरीय विशु स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल अमरावती येथे दि.२८ सप्टेंबररोजी आयोजित करण्यात आल्या होत्या. किनगांवराजा येथील कामक्षा देवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शुभम रवींद्र शिरसाठ या विद्यार्थ्यांने १९ वर्ष वयोगटामध्ये ६० किलो वजन गटामध्ये अमरावती विभागीय स्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त करून राज्यस्तरीय विशु स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

शुभम रवींद्र शिरसाठ हा छत्रपती संभाजीनगर येथे होणार्‍या राज्यस्तरीय विशु स्पर्धेमध्ये अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे. विभागीयस्तरावर प्रथम आलेल्या विशु स्पर्धेमध्ये विजयी विद्यार्थ्यांचे स्वागत व अभिनंदन शाळेचे अध्यक्ष शिवाजीराव काळुसे यांनी केले आहे. यावेळी प्राचार्य उद्धव दराडे, सतीश शिरसाठ, सहाय्यक शिक्षक रामदास सानप, प्रकाश सोनुने, संजय केकान, गजानन मुंढे, राजीव मांटे, नितीन खरात, गजानन थीगळे, संजय काळुसे, उद्धव राठोड, धम्मपाल गवई, गोपाल पवार, गणेश काळुसे, रामेश्वर हरकळ, गजानन काळुसे यांच्यासह आदीजण उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version