– सेवानिवृत्त पोलिस अधिकारी पेठकर व ठाणेदार लांडे यांचा सोमवारी सत्कार!
मेहकर (तालुका प्रतिनिधी) – नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने जानेफळ पोलिस स्टेशनचे सेवानिवृत्त पोलिस अधिकारी माधव पेठकर व अकोला जिल्ह्यातील चांन्नी पोलिस स्टेशनचे ठाणेदार आर. एम. लांडे यांच्या सत्काराचे आयोजन तालुक्यातील देऊळगाव साखरशा येथे नारायण पुरी महाराज संस्थान व देवी मंदिर संस्थानच्यावतीने सोमवारी, दि.२९ सप्टेंबररोजी दुपारी १२ वाजता जगदंबा देवी संस्थान येथे करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच संदीप अल्हाट राहणार आहेत. यावेळी अमरावती पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता सुनील राठी, खामगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील, जानेफळचे कर्तव्यदक्ष ठाणेदार आजिनाथ मोरे, मेहकर पंचायत समितीच्या आरोग्य विस्तार अधिकारी सौ. ज्योतीताई चव्हाणसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सदर कार्यक्रम जगदंबा संस्थान येथे दि.२९ सप्टेंबररोजी दुपारी १२ वाजता पार पडणार आहे. तरी या कार्यक्रमाला बहुसंख्य उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजक नारायण पुरी महाराज संस्थान तसेच देवी मंदिर संस्थान यांच्यावतीने करण्यात आले आहे.