साखरखेर्डा (अशाेक इंगळे) – संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने १६ सप्टेंबर २०२५ ला जिल्हास्तरीय निवड चाचणी राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय, बुलढाणा येथे राज्यस्तरीय प्रेरणा व आव्हान. शिबिरासाठी पाच विद्यार्थांची निवड करण्यात आली . यात प्रियांका देशमुख हिचा सुध्दा समावेश आहे.
Pre RD Camp, state Rd Camp,National RD parade, National Integration Camp, state integration camp, Prerana camp, Aavhan Camp, Utkarsh camp साठी निवड चाचणी पार पडली. यामध्ये विवेकानंद विज्ञान महाविद्यालयाच्या ५ विद्यार्थ्यानी सांस्कृतिक गट व शारीरिक तंदुरुस्त गट ह्यात सहभाग घेतला. ह्यामध्ये शारीरिक तंदुरुस्त गटातून श्याम गिऱ्हे व नेहा घनवट तर सांस्कृतीक गटातून संदेश जाधव , गायत्री गायकी व प्रियंका देशमुख यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये महाविद्यालयाच्या सर्व ५ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड होऊन ते विद्यापीठस्तरीय निवड चाचणीसाठी पात्र ठरले. १९ सप्टेंबर ला विद्यापीठस्तरीय निवड चाचणी ही संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या डॉ.जिचकार सांस्कृतिक सभागृह व परिसरातील मैदानात निवड चाचणी पार पडली. यामध्ये विद्यापीठातील सर्व जिल्हास्तरावरील निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आणि आपले सादरीकरण केले. यामध्ये अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली त्यात सांस्कृतिक गटातून विवेकानंद विज्ञान महाविद्यालयातील कु.प्रियंका देशमुख हिची राज्यस्तरीय प्रेरणा शिबिरासाठी तर शारीरिक तंदुरुस्त गटातून शाम गिऱ्हे व कु.नेहा घनवट यांची निवड राज्यस्तरीय आव्हान शिबिरासाठी झाली. तर प्रेरणा शिबिराच्या प्रतीक्षा यादीत कु.गायत्री गायकी यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांनी दैदिप्यामान यश संपादन केल्याबद्दल विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर बी मालपाणी , उपाध्यक्ष अशोकभाऊ थोरहाते , सचिव संतोष गोरे , महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मीना निकम यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.