परदेशी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला प्रथम बक्षीस

admin 2 Min Read
2 Min Read

– साखरखेर्डा येथे गणराया पुरस्कार वितरण

साखरखेर्डा (अशोक इंगळे) – गणेश उत्सव काळात गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी मंडळातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला गणराया पुरस्काराचे वितरण दि.१९ सप्टेंबररोजी साखरखेर्डा पोलिस स्टेशनच्यावतीने करण्यात आले. प्रथम पुरस्कार परदेशी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला देण्यात आला.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला पुरस्कार वितरण करताना उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील.

गणेश उत्सव ज्या प्रमाणे शांततेत साजरे करुन सहकार्य केले त्या प्रमाणे नवरात्र उत्सव शांततेत साजरा करावा आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांनी शांतता कमेटी आणि गणेश उत्सव मंडळातील बक्षीस वितरण कार्यक्रमात केले. बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील हे होते तर ठाणेदार गजानन करेवाड, माजी सरपंच कमलाकर गवई, माजी सरपंच सुनील जगताप, प्राचार्य संतोष दसरे, पत्रकार डी एन पांचाळ, सेवानिवृत्त मुख्याध्यापक रमेश ठोसरे, ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे सिंदखेडराजा तालुका विशेष प्रतिनिधी तथा ज्येष्ठ पत्रकार अशोक इंगळे, गोपाल शिराळे, गणेश शिराळे उपस्थित होते. प्रथम पुरस्कार ११ हजार रुपये आणि ट्रॉफी परदेशी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आशीष कामे यांनी स्वीकारला. तर द्वितीय बक्षीस ७ हजार रुपये आणि ट्रॉफी महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष संतोष मंडळकर यांना तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस ५ हजार रुपये आणि ट्रॉफी हिंदू सूर्य महाराणा प्रताप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सुरेश राजपूत यांनी स्विकारला. उत्कृष्ट गणेशमूर्ती पुरस्कार श्री शिवाजी व्यायाम शाळा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे उपाध्यक्ष सोमेश इंगळे, सांस्कृतिक कार्यक्रमाचा पुरस्कार श्री शिवाजी हायस्कूल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे गजानन कुले यांना देण्यात आला. दि.२२ सप्टेंबरपासून साखरखेर्डा येथे नवदुर्गा स्थापना होत असून, रात्री महिलांची उपस्थिती जास्त असते. गरबा खेळताना महिलांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता मंडळातील पदाधिकारी यांनी घ्यावी, असे आवाहनसुद्धा प्रदीप पाटील यांनी केले. पोलिस उपनिरीक्षक गणेश डोईफोडे यांनी आभार मानले.

Share This Article
Exit mobile version