विकी जगताप उपविभागीय अध्यक्ष; संजय सोनुने तालुका अध्यक्षपदी बिनविरोध निवड!
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – सिंदखेडराजा तहसील कार्यालयात महसूल कर्मचारी संघटनेच्या बांधणीच्या पार्श्वभूमीवर १९ सप्टेंबर २०२५ रोजी सायं. ६.३० वाजता पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक पार पडली. संघटनेचे राज्य सरचिटणीस व जिल्हाध्यक्ष बुलढाणा किशोर हटकर आणि महसूल कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे सचिव मिलिंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक रंगली.
या बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांच्या एकमुखी आग्रहास्तव विकी जगताप यांची उपविभागीय अध्यक्षपदी तर संजय सोनुने यांची तालुका अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमुळे महसूल संघटनेत नव्या उर्जेला चालना मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. या वेळी जिल्हा उपाध्यक्ष कैलास राऊत, गेस्ट सभासद प्रल्हाद शेळके, निवासी नायब तहसीलदार प्रांजल पवार यांच्यासह गणेश नागरे, जानकिराम शिपे, लहाने मॅडम, रोकडे मॅडम, भंडारी मॅडम, चिबडे मॅडम, इंगळे मॅडम, अंभोरे मॅडम आदी मान्यवर व सर्व महसूल कर्मचारी उपस्थित होते. बैठकीत महसूल अधिकाऱ्यांच्या विविध प्रश्नांवरही सकारात्मक चर्चा झाली. निवड सर्वानुमते व शांततेत पार पडल्याचे उपस्थितांनी सांगितले.