– स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील अनोखा उपक्रम
चिखली (एकनाथ माळेकर) – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील अनोखा उपक्रम चिखली तालुक्यातील मिसाळवाडी या गावात पार पडला आहे. आजी व माजी अशा २६ सैनिकांना मिसाळवाडीकरांनी कृतज्ञता सोहळ्याद्वारे मानवंदना दिली. ध्वज सलामी, डीजे, ढोल-ताशांच्या गजरात गावातून निघालेली मिरवणूक आणि ग्रामस्थांनी केलेला यथोचित सन्मान या सोहळ्याने तालुक्यातील हे सैनिक चांगलेच भारावून गेले होते. राष्ट्रसेवेसाठी आपले सर्वोच्च योगदान देणार्या सैनिकांच्या सन्मानाच्या या उपक्रमाची देश पातळीवरील मीडियानेदेखील दखल घेतली होती.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत मिसाळ यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सुनील शिनगारे यांनी मानले. हा अनोखा कार्यक्रम आयोजन व यशस्वी करण्यासाठी मिसाळवाडीचे सरपंच विनोद मिसाळ, तसेच ग्रामपंचायत सदस्य सुनील मिसाळ, देविदास मिसाळ, शिवशंकर मिसाळ, सतीश भगत, अशोक भगत यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. याप्रसंगी ग्रामस्थांच्यावतीने या सैनिकांसाठी स्नेहभोजनाचेदेखील आयोजन करण्यात आले होते.

