घरकुल व सिंचन विहिरीप्रश्नी शिवसेनेचा चिखलीत बीडीओंना घेराव!

admin 1 Min Read
1 Min Read

– थकलेले घरकुलाचे पैसे व रखडलेल्या सिंचन विहिरीचे प्रकरणे निकाली काढा; शिवसेना आक्रमक!

चिखली (राजेश लोखंडे) – बर्‍याच दिवसापासून चिखली तालुक्यातील सर्व गोरगरीब जनता पंचायत समितीच्या कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. अनेकांच्या घरकुलाचे बांधकाम चालू आहे. अनेकांचे घरकुल पूर्ण झालेले आहे. परंतु, घरकुलाच्या अनुदानासाठी सामान्य जनता त्रस्त असून, त्यांचे अनुदान तात्काळ टाकण्यात यावे, तसेच रखडलेले सिंचन विहिरीचे प्रकरणे निकाली काढून तात्काळ सिंचन विहिरी मंजूर करण्यात याव्या. यासाठी चिखली शिवसेना, युवासेना, किसान सेनेच्यावतीने पंचायत समितीच्या अधिकार्‍याला घेराव घालून जाब विचारण्यात आला. या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे आश्वासन दिल्यानंतर निवेदनाअंती आंदोलन स्थगित करण्यात आले. निवेदन देतेवेळी सर्व शिवसेना, युवासेना, किसान सेना, ज्येष्ठ शिवसैनिक, आजी माजी लोकप्रतिनिधी, आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version