– १५ हजार ६३१ पदांसाठी भरती प्रक्रियेस मान्यता; वयोमर्यादा ओलांडलेल्यांना मोठा दिलासा!
मुंबई/सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – महाराष्ट्र शासनाने राज्यातील पोलीस शिपाई व कारागृह शिपाई संवर्गातील तब्बल १५,६३१ रिक्त पदे भरण्याला हिरवा कंदील दिला आहे. या भरती प्रक्रियेबाबत गृह विभागाने १० सप्टेंबर २०२५ रोजी शासन शुद्धिपत्रक काढले असून इच्छुक उमेदवारांसाठी ही मोठी आनंदवार्ता ठरली आहे.
वयोमर्यादा ओलांडलेल्यांनाही संधी – गृह विभागाच्या निर्णयानुसार, सन २०२२, २०२३, २०२४ व २०२५ या कालावधीत वयोमर्यादा पूर्ण केलेल्या उमेदवारांना एक वेळचा विशेष अपवाद करून अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. यामुळे अनेक पात्र उमेदवारांना पुन्हा एकदा संधी उपलब्ध होणार आहे. सदर शुद्धिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याचा संकेतांक : २०२५०९१०१२००८४९२२९ असा आहे. राज्यपालांच्या आदेशानुसार व नावाने हे शुद्धिपत्रक उप सचिव रविंद्र पाटील यांनी स्वाक्षरीत केले आहे.
भरतीसाठी मंजूर पदसंख्या
- पोलीस शिपाई व कारागृह शिपाई संवर्ग
- एकूण रिक्त पदे : १५,६३१
- कालावधी : ०१ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यान रिक्त झालेली व होणारी पदे

