उदगीर येथे खुल्या बॅटमिंटन स्पर्धा उत्साहात!

editor 1 Min Read
1 Min Read

लातूर (गणेश मुंडे) – आजादी का अमृत महोत्सवानिमित्त उदगीर तहसील कार्यालयाने उदगीर तालुक्यातील बॅडमिंटन खेळाडूसाठी खुल्या पुरुष दुहेरी बॅडमिंटन स्पर्धा जुने तहसिल कार्यालयातीळ बॅडमिंटन कोर्टवर आयोजित केल्या होत्या. सदर स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा न्यायाधीश डी पी सतावळकर व जिल्हा न्यायाधीश राजेंद्र गिरी यांच्या हस्ते करण्यात आले. बॅडमिंटन स्पर्धेमध्ये एकूण १६ संघ व ३२ खेळाडूंनी सहभाग नोंदवला या यापैकी तीन संघ विजेता घोषित करण्यात आले.

या स्पर्धेत प्रथम विजेता राजेश चटलावार आणि नागेश लाला, द्वितीय विजेता संतोष गुट्टे आणि संतोष चव्हाण, तृतीय विजेता परीक्षेत शिंदे व शंकर जाधव यांना स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्रक व पदक देऊन गौरव करण्यात आले. खेळाडूंना पारितोषिक वितरण हे उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी व तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. सदर स्पर्धेसाठी भारत चामले, अ‍ॅड. बालाजी पाटील, डॉ.संदीप मुक्कावर, संदीप सानप, डॉक्टर स्वामी व इतर मान्यवर उपस्थित होते. पंच म्हणून अमित सिद्धेश्वरी यांनी काम पाहिले तर गुणलेखक म्हणून विशाल कदम यांनी काम पाहिले.

Share This Article
Exit mobile version