– अर्ज सादरीकरणाची अंतिम तारीख आता 26 ऑगस्टपर्यंत!
– सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशीष शेलार यांची घोषणा!
बुलढाणा (सुरेश हुसे) – राज्य शासनाच्यावतीने यंदापासून महाराष्ट्रातील गणेशोत्सव हा ‘महाराष्ट्राचा राज्य उत्सव’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या राज्य उत्सवाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या “महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2025” साठी अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखेस मुदतवाढ देण्यात आली आहे.
राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी जाहीर केले की, आता या स्पर्धेसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख मंगळवार, दि. 26 ऑगस्ट 2025 असेल. अधिकाधिक गणेशोत्सव मंडळांना या स्पर्धेत सहभागी होता यावे, यासाठीच मुदतवाढ देण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या स्पर्धेसाठीचे अर्ज राज्य शासनाच्या अधिकृत https://ganeshotsav.pldmka.co.in या ऑनलाइन पोर्टलवर उपलब्ध आहेत. सर्व मंडळांनी ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज सादर करावेत, असेही त्यांनी नमूद केले. या स्पर्धेत तालुका, जिल्हा आणि राज्य या तीनही स्तरांवर पारितोषिके देण्यात येणार असून, गणेशोत्सव मंडळांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी केले आहे.

