पोलीस दलातर्फे २७ जूनपासून सुरू असलेली ७५ किलोमीटर दाैड आज अक्कलकुवा येथे संपन्न

editor 1 Min Read
1 Min Read

नंदूरबार (जिल्हा प्रतिनिधी) – पोलीस दलातर्फे आयोजीत ७५ किमी दौडचा कार्यक्रम आज अक्कलकुवा येथे संपन्न झाला आहे.  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पोलीस दला तर्फे २७ जुन पासुन या दौडीचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस दलातील ४७ अधिकारी कर्मचारी यांनी या दौडीत सहभाग नोंदवत ही दौड पुर्ण केली आहे.  नंदुरबार तालुका पोलीस स्टेशन, सारंगखेडा, शहादा, तळोदा मार्ग ही दौड आज अक्कलकुवा येथे पुर्ण झाली आहे.  यावेळी या दौडीत पारीतोषक पटकावलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना पदक देवुन सन्मान करण्यात आला.  या दौडीला प्रोत्साहन देण्यासाठी ठिकठिकाणी विद्यार्थी आणि नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version