सोन्याच्या पोती चोरणारी महिलांची टोळी चिखली बसस्थानकातून जेरबंद

admin 2 Min Read
2 Min Read

– जालना व बीड जिल्ह्यातील महिला चिखली बसस्थानकात चोरत होत्या सोन्याच्या पोती

चिखली (राजेश लोखंडे) – चिखली बसस्थानकावर वृद्ध महिला प्रवाशाच्या गळ्यातील सोन्याची पोत जबरीने चोरी करणार्‍या तीन महिलांना पोलिसांनी रंगेहाथ पकडून अटक केली असून, चोरी केलेली सोन्याची पोत जप्त करण्यात आली आहे.

या बाबत  फिर्यादी महिला कासुबाई पांडुरंग खरात (वय ६५) आणि त्यांची मुलगी ज्योती सरदार ह्या दोघी सैलानी बाबाच्या दर्शनासाठी चिखली येथील बसस्थानकावर आज आल्या होत्या. दुपारी सुमारे दीड वाजता बसमध्ये चढत असतांना गर्दीचा फायदा घेत, तीन अनोळखी महिलांनी फिर्यादींच्या गळ्यातील सोन्याची पोत, त्यात २ डोरले व २६ मणी, एकूण ३ ग्रॅम अंदाजे किंमत २७ हजार रुपये जबरीने खेचून पळवली. फिर्यादींनी आरडाओरड केल्यानंतर बसस्थानक ड्युटीवरील पोलिस हवालदार सावळे यांनी त्वरित धाव घेत, आरोपी महिलांना थांबविले आणि विचारपूस केली असता, त्या महिला १) संगीता विलास पवार (वय ३५, वर्षे, रा. विरेगाव, जिल्हा, जालना), २) निशा राहुल धोत्रे (वय २४ वर्षे, रा. रेवकी, ता. गेवराई, जिल्हा. बीड), ३) शेषुबाई पांडुरंग पवार (वय ४४ वर्षे, रा. मंगरूळ, ता. घनसावंगी, जि. जालना) असे असून, चिखली पोलिसांनी तिन्ही आरोपी महिलांना अटक करून, गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान आरोपी निशा धोत्रे हिच्याकडून चोरीस गेलेली सोन्याची पोत जप्त करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, अपर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संग्राम पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आली. तपास व अटक कारवाईत डी.बी. पथक प्रमुख पोलिस उपनिरीक्षक समाधान वडणे, सफौ राजेंद्र काळे (बॅज नं. ९०२), पोहेकॉ विजय किटे (बॅज नं. २०७२), पोना अमोल गवई (बॅज नं. २२६१), पोकॉ प्रशांत धंदर (बॅज नं. ५८१), पोकॉ अजय इटावा (बॅज नं. ४५४), पोकॉ पंढरीनाथ मिसाळ (बॅज नं. १२१६), पोहेकॉ नीलेश सावळे (बॅज नं. १३४७), पोहेकॉ राहुल पायघन (बॅज नं. २५७०) आणि महिला पोलिस कॉन्स्टेबल रुपाली उगले (बॅज नं. २४१८) यांचा समावेश होता.

Share This Article
Exit mobile version