चिखलीत संजय गायकवाडांचा जनसंवाद मेळावा; भाजप-शिवसेना समीकरणात नवा तडाखा!

admin 3 Min Read
3 Min Read

– चिखलीची नगरपरिषद ताब्यात घेणार, वाडा-वार्डात शिवसेना पोहोचविण्याचा निर्धार
– बुलढाण्यासारखा विकास चिखलीत करण्याची चिखलीकरांना दिली ग्वाही!

चिखली (महेंद्र हिवाळे) – बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात ‘महायुती’तील सत्तासमीकरणांना हलवणारा संदेश देत, चिखलीचे आमदार संजय गायकवाड यांनी रविवारी (दि.१० ऑगस्ट) आपल्या मतदारसंघात भव्य जनसंवाद मेळाव्याद्वारे ताकद दाखवली. मौनी बाबा संस्थान येथे युवानेते मृत्युंजय गायकवाड यांच्या पुढाकारातून भरवलेल्या या बैठकीत गावागावात शिवसेना पुन्हा उभारण्याचा, वाडा-वार्डापर्यंत भगवा फडकावण्याचा आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चिखली नगराध्यक्षपद शिवसेनेच्याच खात्यात जाण्याचा निर्धार गायकवाडांनी जाहीर केला.

महायुतीत चिखलीत भाजपचा आमदार असतानाही, शिंदे गटाचे बुलढाणा जिल्हा संघटक संजय गायकवाड यांनी थेट आदेशाच्या स्वरात ‘चिखली नगराध्यक्षपद शिवसेनेचाच!’ असा गर्जना केली. याचबरोबर पंचायत समिती व जिल्हा परिषदेतही शिवसेना सदस्य निवडून आणण्याचे आव्हान त्यांनी कार्यकर्त्यांना दिले. बैठकीत गायकवाडांनी संघटन बांधणी, शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर शिवसेनेचा थेट हस्तक्षेप, शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविणे आणि बुलढाण्यासारखा विकास चिखलीत घडविण्याचे लक्ष्य स्पष्ट केले. ‘काही गावे बुलढाण्याशी जुळलेली असून, तेथील लोक मला आपल्या मतदारसंघात घेण्याची विनंती करतात. पण मीच त्यांच्या दारी जातो,’ असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवला. मंचावर मृत्युंजय गायकवाड, विजय अंभोरे, अनुजाताई साळवे यांच्यासह अनेक पदाधिकारी व शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. या मेळाव्यानंतर चिखलीतील भाजप-शिवसेना समीकरणांवर नवा तडाखा बसल्याचे बोलले जात असून, स्थानिक स्वराज्य निवडणुकांची रंगत आधीच वाढली आहे. याप्रसंगी राज्य युवासेना कार्यकारणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, शिवसेना नेते विजय अंभोरे, अनुजाताई सावळे, राहुल खेडेकर, प्रा. अमोल वानखेडे, प्रा. अनिल रिंढे, गजानन लांडे पाटील, कपिल खेडेकर, विलास घोलप, रोहित खेडेकर, श्रीकांत गायकवाड, सागर शेळके, मयूर बाहेकर, राजेश मुंगळे, निलेश गुजर, संदीप गायकवाड, ज्ञानदेव शेळके, वाघमारे सर, शरद जवंजाळ, राजू पाटील पडघान, विनोद वनारे, ज्ञानेश्वर वाघ, राजाराम पिंपळे, अनिल सुसर, मयुर पडोळ, बाळासाहेब उबरहंडे, सादिक काजी, रवींद्रभाऊ डाळिंबकर, गजानन वीरशीद, अमोल बाहेकर, कैलास थुट्टे, श्रीकांत टेहरे, अमोल पाटील, दादाराव महाले, पवन चिंचोले, सादिक शेख, दादाराव राऊत, सुरेशसिंग धनावत, मोहन वाघ, गणेश निकम, एकनाथराव चव्हाण, रोहित व्यवहारे, विनोद गायकवाड, केशवराव साखडे, प्रदीप कोल्हे, किशोर जेउघाले, रामेश्वर शेवाळे, दीपक दिंडे, मदनराजे गायकवाड, गजानन रोजेकर, विशाल शेळके, दीपक सुरडकर, विजय काळवाघे, विष्णूमामा मुळे, निलेश पाटील, बाळाभाऊ जेउघाले, विजय कल्याणकर, गोपाल जाधव, संजय निकम, अजय खोत, योगेश परसे, अर्जुन नेमाडे, शरद ताठे, भास्करराव डुकरे, श्रीकृष्ण शिंदे, ज्ञानेश्वर खांडवे, पिंटू काटकर, सतीश जवंजाळ, रोहित गवळी, रवी भगत, दीपक मिटकरी, अक्षय चिंचोले आणि असंख्य जेष्ठ व युवा शिवसैनिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमोल वानखेडे व प्रा. अनिल रिंढे यांनी केले.


“चिखली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढवणे ही फक्त सुरुवात आहे. येत्या काळात प्रत्येक गावात आणि शहराच्या प्रत्येक वॉर्डात शाखा सुरु करून संघटनेला नवा उत्साह देणार आहे. शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवू. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भगवा फडकविण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. चिखली नगरपालिकेत शिवसेनेचा नगराध्यक्ष विराजमान व्हावा, ही मनापासूनची इच्छा आहे आणि त्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करू.”

– संजय गायकवाड, आमदार बुलढाणा (शिंदे गट)

Share This Article
Exit mobile version