एसटी बसच्या चालक-वाहकांना राख्या बांधून केले रक्षाबंधन साजरे!

admin 1 Min Read
1 Min Read

– मासरूळ येथील ‘शिवसाई’च्या विद्यार्थिनींचे रक्षाबंधन ठरले अनोखे!

चिखली (राजेश लोखंडे) – मासरूळ येथील शिवसाई ज्ञानपीठ व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींनी चिखली – धाड या बसच्या चालक व वाहकांना राख्या बांधून यंदाचे रक्षाबंधन अनोख्या पद्धतीने साजरे केले. विद्यार्थिनींच्या या सहदर्यी रक्षाबंधनाची चांगली चर्चा या परिसरात सुरू होती. आज रक्षाबंधनाचा महत्वपूर्ण सण असला तरी एसटी बसच्या चालक व वाहकांना आपले कर्तव्य हे पार पाडावेच लागते. विद्यार्थिनींनी हातात राख्या बांधल्यानंतर तेदेखील हरखून गेले होते.

शिवसाई ज्ञानपीठ व उच्च माध्यमिक विद्यालय, मासरूळ येथील विद्यार्थिनींनी जनतेची अहोरात्र सेवा करणारे एस टी महामंडळाचे कर्मचारी चालक व वाहक यांना राखी बांधून धाड बसस्थानक येथे रक्षाबंधन हा सण साजरा केला. हे सर्व कर्मचारी चोवीस तास जनतेच्या सेवेमध्ये असताना आजच्या दिवशी ते आपल्या बहिणीपर्यंत पोहोचू शकत नाही, हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आजच्या दिवशी रक्षाबंधन शिवसाई ज्ञानपीठ मासरूळ येथील वर्ग नववी व दहावीच्या विद्यार्थिनींनी त्यांच्यासोबत साजरा केले. यावेळी चिखली ते धाड या बसचे वाहक पी.टी. इंगळे व चालक डी. बी.राऊत यांच्या हातात राख्या बांधण्यात आल्या. शिवसाई पतसंस्थेचे अध्यक्ष दौलतराव नरवाडे सर, प्राचार्य प्रा.अरुण गुळवे सर, मुख्याध्यापिका सौ.संगिता नरवाडे मॅडम, व्यवस्थापक सुखदेव नरवाडे, पत्रकार किरण देशमुख, सौ.अंजना सपकाळ आदींची याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थिती होती.

Share This Article
Exit mobile version