करवीर पोलीस प्रशासनाच्यावतीने ‘हर घर तिरंगा’ जनजागृती रॅली

editor 1 Min Read
1 Min Read

कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी) : वडणगे (ता. करवीर) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहेत.  केंद्र सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ या मोहिते सर्वांनी सहभागी व्हावे, या करीता करवीर पोलीस प्रशासनाच्यावतीने वडणगे ग्रामस्थांच्या मध्ये जनजागृती करण्यासाठी ‘हर घर तिरंगा’ रॅली काढण्यात आली.

ही रॅली देवी पार्वती हायस्कूल वडणगे येथील विद्यार्थी शिक्षक कर्मचारी व सर्व पक्षीय कृती समिती यांच्या समवेत सुरू होवून संघर्ष चौक , मेन रोड दुकान गल्ली , जय भवानी चौक व पार्वती चौक या ठिकाणी अखेर सांगता करण्यात आली. या रॅली मधील सहभागी सरपंच सचिन चौगले,  पंचायत समिती सदस्य इंद्रजित पाटील ,  तानाजी पाटील , सहाय्यक  पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे, निवास पोवार, अविनाश पोवार ,  विक्रांत चव्हाण यांच्यासह करवीर पोलीस ठाणे, सर्व कर्मचारी वर्ग आणि वडणगे पोलीस पाटील उमेश नांगरे हे
या रॅलीत सहभागी होते.

Share This Article
Exit mobile version