पोलीस निरीक्षकांकडून कोठडीची पाहणी

editor 1 Min Read
1 Min Read

कर्जत : किरण जगताप

कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पोलीस कोठडीची पाहणी करत आरोपींना दिल्या जाणाऱ्या सुविधांचा आढावा घेतला. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व बराकीवरील छत सुस्थितीत असल्याबाबतची माहिती घेवून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून तात्काळ डागडुजी सुरु केली.

यावेळी चंद्रशेखर यादव म्हणाले, सर्व पाचही बराकीमध्ये पाईपलाइन टाकून पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. नुकतेच इमारतीचे रंगकाम करून घेण्यात आलेले आहे. सध्या परिसर सुशोभीकरण करण्यात येत आहे. आरोपी पळून जाण्याचे प्रकार घडू नयेत यासाठी छताच्या खालील बाजूस लोखंडी छत बसवण्यात आले आहे. पुढील बाजूस भिंत बांधण्यात आली. बराकीत स्वच्छ्तागृह बांधण्यात आले. झाडेझुडपे कमी करण्यात आली आहेत.

यावेळी कर्जत तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मोतीराम शिंदे, मुन्ना पठाण, कर्जत तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रा. किरण जगताप यांनी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्याशी चर्चा करून कामकाजाची माहिती घेतली. पत्रकारांनी आरोपींशी संवाद साधला. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल सुनिल खैरे व इतर कर्मचारी उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version