नगर/शेवगाव (बाळासाहेब खेडकर) – शेअर मार्केटच्या नावाखाली ८० लाख ३० हजार रुपयांचा गंडा घालणार्या आरोपीवर गुन्हा दाखल होताच, शेवगाव पोलिसांनी १२ तासाच्याआत पुणे जिल्ह्यातून आदित्य कुंदा अंधारे या फरार आरोपीला मोठ्या शिताफीने पोलिसांनी गजाआड केले आहे.
शेअर मार्वेâटमध्ये फसवणूक झाल्याप्रकरणी प्रशांत महादेव नलावडे वय ३६ वर्षे, धंदा शेती रा. विदयानगर शेवगाव यांच्या फिर्यादीवरुन ट्रेडींग मल्टीसर्विसेस नावाचे शेअर मार्केट या नावाने शेअर मार्केट ट्रेडिंग इन्फिनिटी शिवनगर, शेवगाव व पुणे येथे कंपनीच्या नावाखाली लाखो रुपयांची फिर्यादी व साक्षीदार यांचा विश्वास संपादन करुन फसवणुक झाल्याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरुन शेवगांव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण) अधिनियम, १९९९ चे कलम-३ प्रमाणे दि ४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हयातील आरोपी फरार झाल्याची माहिती कळल्याने भौतिक व तांत्रिक बाबींची पडताळणी केली असता नमुद गुन्हयातील आरोपी हा पुणे येथे गेले असल्याचे समजल्याने पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, यांनी गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक पुणे येथे रवाना केले. गुन्हयातील आरोपी आदित्य् कुंदा अंधारे वय-२५ रा. शिवनगर, शेवगाव नर्हेगाव. ता- हवेली, जिल्हा- पुणे येथे आरोपीचा शोध घेत असतांना आरोपीला पोलीस पथक आल्याची चाहूल लागताच पळून जात असताना आरोपीला पोलीसांनी आरोपीचा पाठलाग करुन शिताफीने ताब्यात घेवून आज मंगळवारी गुन्ह्यात अटक केली आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अहिल्यानगर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील उपविभाग शेवगांव यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोसई बाजीराव सानप, पोहेकों किशोर काळे, पोकों शाम गुंजाळ, पोकों भगवान सानप, पोकों दादासाहेब खेडकर, पोकों राहुल आठरे, पोकों ईश्वर बेरड, पोकों राजु बढे, पोकों सचिन पिरगळ, पोकों रोहित पालवे व नगर दक्षिण सायबर सेलचे पोकों राहुल गुड्डु यांनी केली. गुन्ह्यांचा पुढील तपास पोसई बाजीराव सानप हे करत आहेत.
शेवगांव तालुक्यात शेअर्स मार्केटबाबत वरिल आरोपी विरुध्द इतर कोणीही व्यथीत अगर बळीत अशा जनतेची फसवणूक झाली असल्यास त्यांनी शेवगाव पोलिसाशी बिनधास्त संपर्क करण्याचे अहवान केले आहे. गुन्हे दाखल होऊन आरोपी फरार झालेत. परंतु फसणूक झालेल्या गुतंवणूकदारांना सोशल मीडियावर गोड बोलून किंवा धमक्या देऊन गप्प करण्याचा प्रयत्न करतात, अश्या प्रकारची माहिती शेवगांव पोलीस प्रशासनाला दिल्यास फरार आरोपी जेरबंद करायला मदत होईल व फसवणूक झालेल्या हजरो गुंतवणूकदार व पोलीस मित्रांनी याची दखल घेऊन संबंधित पोलीस अधिकार्यांशी संपर्क करण्याचे पोलिसांनी आवाहन केले आहे.