गायत्रीच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा!

admin 1 Min Read
1 Min Read

– ‘नारी रत्न सन्मान’ आणि ‘बेस्ट जुरी अँड मॉडेल’ पुरस्काराने गौरव!

शेगाव/सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – कार्यकुशलता, अष्टपैलू प्रतिभा आणि आत्मविश्वासाच्या जोरावर समाजात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गायत्री रोहणकर हिला पुण्यातील साई सोशल स्पोर्ट्स फाऊंडेशनतर्फे दोन मानाचे पुरस्कार बहाल करण्यात आले. भव्य समारंभात ‘नारी रत्न सन्मान’ आणि ‘बेस्ट जुरी अँड मॉडेल’ या किताबांनी तिचा गौरव झाला.

सौंदर्य, सामाजिक भान आणि फॅशन क्षेत्रातील भरीव योगदानाची ही दखल असल्याचे आयोजकांनी सांगितले. फॅशन व इंडस्ट्री क्षेत्रातील तिच्या कामगिरीबरोबरच ज्युरी म्हणून निष्पक्ष व तज्ज्ञ निर्णय क्षमतेला विशेष मान्यता लाभली आहे. या यशामुळे गायत्री अनेक महिलांसाठी प्रेरणास्थान ठरली असून, तिच्यावर सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Share This Article
Exit mobile version