नंदुरबार शहरात तंजीमे उलमातर्फे तिरंगा रॅली

editor 1 Min Read
1 Min Read

नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी) –  भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त हर घर तिरंगा अभियान जनजागृतीसाठी तंजीमे उलमा नंदुरबार तर्फे आज दुपारी २.०० वाजता मदरसा रियाजुल जन्ह मुजावर मोहल्ला येथून मदर्सात शिकणारे विद्यार्थ्यांची तिरंगा रॅली काढण्यात आली.

ही तिरंगा रॅली ईलाही चौक, खिलाफत चौक, सोनार खुंट, गणपती मंदिर, शास्त्री मार्केट, नेहरू पुतळा, हाट दरवाजा, अली साहेब मोहल्ला, माळीवाडा व चिराग गल्ली असे शहरातील प्रमुख चौक येथून काढण्यात आली. मदरसा मध्ये शिकणाऱ्या लहान लहान चिमुकल्यांनी संपूर्ण शहराचे लक्ष वेधले होते.  रॅलीचे आयोजन मौलाना जावेद साहब सारोदी व मोलाना झकर्या रहमानी यांनी केले होते.

Share This Article
Exit mobile version