संत गजानन महाराज पालखी सोहळ्यासाठी जाणार्‍या वाहनांना उदयनगर नाक्यावर टोल घेऊ नका!

admin 2 Min Read
2 Min Read

– चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांची सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना विनंती; उद्या टोल लागणार नाही!
– टोल नाक्यावरील तृतीयश्रेणी कर्मचार्‍याला धमकीवजा फोन करणारा नेता तोंडघशी?

चिखली (राजेश लोखंडे) – अवघ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान विदर्भ पंढरी श्री संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरवरून खामगावमार्गे शेगावला उद्या पोहोचणार आहे. या पालखी सोबत हजारो भाविक काही पैदल तर काही गाड्यांनी पालखी सोबत जाणार आहेत. तसेच, पालखी सोहळ्यात विविध सेवा या गाड्यांकडून पुरविल्या जातात. या पार्श्वभूमीवर चिखली ते खामगाव रोडवरील उदयनगर टोल नाका येथे पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी तसेच सेवेसाठी जाणार्‍या वाहनांकडून टोल घेण्यात येऊ नये, अशी विनंती चिखलीच्या विकासकन्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची मंत्रालयात भेट घेऊन केली. याबाबत मंत्र्यांनीदेखील संबंधितांना निर्देश दिल्याची माहिती असून, उद्या भाविकांच्या वाहनांना टोल लागणार नसल्याची माहिती हाती आली आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून चिखलीतील एका नेत्याने टोल नाक्याच्या तृतीयश्रेणी कर्मचार्‍याला फोन करून धमकीवजा भाषा वापरली होती. तसेच, तो व्हिडिओदेखील व्हायरल केला होता. आता या नेता चांगलाच तोंडघशी पडल्याचे दिसून येत आहे.

सविस्तर असे, की भक्ती रसाचा सुरेख संगम असलेल्या या पालखी सोहळ्याच्या मार्गात असलेल्या उदयनगर टोल नाक्यावर उद्या पालखी सोबत असलेल्या विविध वाहनांकडून टोल घेण्यात येऊ नये, यासाठी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन त्यांना या संबंधात विनंती केली. ती विनंती मंत्री शिंवेंद्रसिंह राजे यांनी सकारात्मक घेतली असून, संबंधितांना निर्देश दिले असल्याचे कळते आहे. त्यामुळे उद्या भाविकांच्या वाहनांना टोल लागणार नाही, असेही उच्चस्तरीय सूत्रांकडून सांगण्यात आले. तसेच, आमदार श्वेताताई महाले यांनीदेखील उद्याच्या दिवशी भाविकांच्या वाहनांकडून टोल आकारण्यात येऊ नये, यासाठी संबंधितांना निर्देश दिले आहेत. त्यामुळे, याप्रश्नी राजकारण करण्याचा प्रयत्न करणारा संबंधित नेता चांगलाच तोंडघशी पडल्याचे दिसून येत आहे.

Share This Article
Exit mobile version