सांगलीतील ज्येष्ठ धनगर नेते आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचे समर्थक माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत अण्णासाहेब डांगे यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांचा भाजप प्रवेश झाला. सुपुत्र चिमण डांगे आणि विश्वनाथ डांगे यांचेही भाजपात स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे शिवसेना-भाजप युतीमध्ये मंत्री राहिलेल्या अण्णासाहेब डांगे हे 23 वर्षांनी स्वगृही परतल्याचे दिसून येत आहे. भाजपमध्ये असताना दिवंगत गोपीनाथ मुंडेच्या शिफारसीवरुन त्यांना मंत्रीपद मिळाले होते.