जून व जुलैतील पीक नुकसान भरपाईसाठी फार्मर आयडी नसेल शेतकरी वंचित राहणार!
लोणार (वाजिद खान) – लोणार तालुक्यामध्ये माहे जुन व जुलै या दोन महिन्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे खुप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. तरी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनस्तरावर मिळणाऱ्या मदतीसाठी ऍग्रीस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडी काढणे बंधनकारक आहे, अशी माहिती लोणार तहसीलचे कर्तव्यदक्ष तहसीलदार भूषण पाटील यांनी दिली आहे.
शासकिय योजनेचा लाभघेण्यासाठी ऑग्रिस्टॅक योजने अंतर्गत नोंदणी करणे आवश्यक आहे. माहे जुन व जुलै या दोन महिन्यामध्ये लोणार तालुक्या मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. नैसर्गिक आपत्तीचे नुकसान भरपाई मिळण्यासाठी ऑग्रिस्टॅक अंतर्गत नोंदणी करणे बंधकारक आहे ज्याची नोंदणी झालेली आहे. त्यांनाच लाभ मिळणार आहे. सदरची नोंदणी करण्यासाठी संबंधीत लाभार्थी यांनी 7/12,8 (अ), आधारकार्ड, आधार लिंक असलेला मोबाईल सदरची कागदपत्रे घेऊन नोंदणी करण्यासाठी सेतु सुविधा केन्द्र व नागरी सुविधा केंद्रशी संपर्क करावा. असे आवाहन लोणार तहसीलचे कर्तव्यदक्ष तहसिलदार भूषण पाटील यांनी केले आहे.
- 1) कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण-2024/प्र.क्र. 157/10-ओ, दि. 14 ऑक्टोबर 2024
- 2) शासन पत्र, महसूल व वन विभाग, क्र. संकिर्ण-2022/प्र.क्र. 313/ल-1, दिनांक 29/11/2024.
- 3) नुसार महाराष्ट्र राज्यामध्ये नुसार राज्यातील कृषि क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारकरित्या लाभशेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे, या करिता केंद्र शासनाची ऑग्रिस्टॅक योजना राज्यात राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

