खरिप पीकविमा काढण्यात शेतकरी उदासिन; १९ हजार शेतकर्‍यांनी काढला पीकविमा!

admin 1 Min Read
1 Min Read

– जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी खरिप पिकांचा विमा काढून घ्यावा – तहसीलदार नीलेश मडके

मेहकर (तालुका प्रतिनिधी) – सध्या शासनाच्या प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत पीकविमा काढणे सुरू असून, जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी आपल्या खरिप पिकांचा विमा काढून घ्यावा, असे आवाहन तहसीलदार नीलेश मडके यांनी केले आहे. प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या भित्तीपत्रक वाटपाचा शुभारंभ काल, दि.२१ जुलैरोजी तहसील कार्यालयात तहसीलदार नीलेश मडके यांच्याहस्ते झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. दरम्यान, पीकविमा काढण्यात शेतकर्‍यांची उदासिनता दिसून येत असून, आजपर्यंत तालुक्यातील जवळजवळ १८ हजार ८०० शेतकर्‍यांनी आपल्या खरिप पिकांचा विमा काढल्याची माहिती आहे.

शासनाच्या प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत पीक विम्याच्या माध्यमातून पिकाला सुरक्षा कवच देण्यात येते. या अगोदर बरेच शेतकर्‍यांना या विम्याचा लाभसुध्दा झाला आहे. यावर्षीही १ जुलैपासून खरिप पिकांचा विमा एआयसी या विमा कंपनीकडून काढण्यात येत आहे. मेहकर तालुक्यातील १८ हजार ८०० शेतकर्‍यांनी आजपर्यंत आपल्या खरिप पिकाचा विमा काढला असल्याची माहिती आहे. ३१ जुलैपर्यंत जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी आपल्या खरिप पिकाचा विमा काढून घ्यावा, असे आवाहन तहसीलदार नीलेश मडके यांनी केले आहे. यावेळी विमा कंपनीचे तालुका समन्वयक तुषार डोंगरे, तालुका समन्वयक आशीष पुरी तसेच श्रीकृष्ण गवई, वसिम शहा यांच्यासह कर्मचारी तसेच शेतकरी उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version