सहा महिन्यांपूर्वीच मंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन झालेल्या स्टेडियमचे छत कोसळले!

admin 1 Min Read
1 Min Read

– खेळाडूंच्या जीविताला धोका; नगरपरिषदेच्या दर्जाहीन कामाचा बुरखा फाटला!

वर्धा (प्रकाश कथले) – देवळी येथे १४.२९ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या विदर्भ केसरी श्री रामदासजी तडस इनडोअर स्टेडियमचे छत कोसळल्याने देवळी नगरपरिषदेच्या बेजबाबदार कारभाराची भ्रष्टाचाराची घटना आज समोर आली आहे, व त्यामुळे शहरातील नागरिक व खेळाडूंच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या स्टेडियमचे सर्व काम नागपूरच्या कंत्राटदार ए ग्लोबिया क्रियेशन्सने केले होते. तर स्टेडियमचे उद्घाटन सहा महिन्यांपूर्वी २५ जानेवारी २०२५ रोजी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते झाले होते, या घटनेने स्टेडियमच्या दर्जाहीन बांधकामाचा बुरखा फाटला आहे.

सुरुवातीपासूनच नागरिकांनी या स्टेडियमच्या ठिकाणाचा विरोध केला होता, कारण स्टेडियम उभारलेले देवळीच ऐतिहासिक मैदान आहे, त्यांच्या आक्षेपांकडे दुर्लक्ष करून प्रशासनाने हे स्टेडियम बांधले. ही पहिली घटना नाही; याआधीही येथील छताचे भाग दोन-तीन वेळा कोसळले आहेत. सुदैवाने या घटनेत मोठी दुर्घटना होण्याचे टळले. नुकत्याच या स्टेडियममध्ये राष्ट्रीय महिला कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत ही स्पर्धा झाली. दररोज संध्याकाळी येथे खेळाडू येतात, याकामाची सखोल चौकशी करून यात दोषी असलेल्यावर कारवाई करावी, कामांचे स्पेशल ऑडीट करावे, अशी मागणी युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष किरण ठाकरे आणि त्यांच्या सहकारी देवळीकरानी केली आहे.

Share This Article
Exit mobile version