साखरखेर्डा येथे ४ लाखांचा अवैध गुटखा, पान म्हसाला जप्त; साखरखेर्डा पोलिसांची कामगिरी, एकास अटक!

admin 2 Min Read
2 Min Read

– गुटखा विक्रीस बंदी असताना, साखरखेर्डा येथे खुलेआम होते गुटखाविक्री!

साखरखेर्डा (अशोक इंगळे) – येथील एका किराणा दुकानात अवैध गुटखा विक्री होत असल्याची माहिती साखरखेर्डा पोलिसांना मिळताच त्यांनी काल रात्री ८ वाजता छापा टाकून एकूण २ लाख ९५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एका आरोपीस अटक केली आहे.

साखरखेर्डा येथील अनेक किराणा दुकानातून अवैध गुटखा विक्री होत आहे. विशेष म्हणजे, साखरखेर्डा येथे ज्या परिसरात प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा आहेत, त्या परिसरात अनेक पान ठेल्यावरुन पान मसाला गुटखा विक्री होत आहे. शासनाने १०० मीटर परिसरात गुटखा विक्री करण्यास बंदी घातली असताना, साखरखेर्डा येथे खुलेआम ही विक्री होते. याकडे अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांच्याकडे तक्रार करुनही त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही. शेवटी साखरखेर्डा पोलिसांना याची दखल घ्यावी लागली. साखरखेर्डा येथील भावसार यांच्या किराणा गोडाऊनमध्ये १५ जुलै रोजी साखरखेर्डा पोलिस स्टेशनचे दुय्यम ठाणेदार रविंद्र सानप यांच्यासह पोलिसांनी छापा टाकला होता. त्यात प्रिमीयम राजनिवास पान मसाला २०० रुपये किंमतीची प्रत्येकी ५० पाऊच एकूण पाकेट ५९० किंमत १ लाख १८ हजार, प्रिमीयम आर एन १ जाफराबादी जर्दा १५ रुपये किंमतीची ३० पाऊच ५९० पॅकेट २९ हजार ५००, वाह पान मसाला प्रत्येकी १२० रुपये किंमतीची ३० पाऊच एकूण २५६ किमंत ३० हजार ७२०, डब्ल्यु च्युवींग सुगंधित तंबाखू ३० पाऊच २५६ पाकिट ३८८०, केसर युक्त प्रीमीयम नजर ९००० पान मसाला ८१० पाकीट किंमत १ लाख १३ हजार ४००, असा एकूण २ लाख ९५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आज १६ जुलै रोजी अन्न व औषध प्रशासन अधिकारी गुलाबसिंग किर्ता वसावे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम ठाणेदार रविंद्र सानप यांनी आरोपी कृष्णा संजय भावसार वय २७ रा . साखरखेर्डा यांच्या विरुद्ध अन्न सुरक्षा कायदा २००६ कलम २६(१) , कलम २६(२) (आयव्ही) कलम २७(२) , कलम २७(३) , ( सी ) ३(१) , (२२) , ५९ भारतीय न्याय संहिता २२३ , २७४ , २७५ , १२३ , ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास दुय्यम ठाणेदार रविंद्र सानप करीत आहेत.

Share This Article
Exit mobile version