संत मुक्ताईने माऊलींसह तिघाही संतबंधूंना बांधली राखी!

editor 1 Min Read
1 Min Read

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : हिन्दू धर्म संस्कृती अनेक विध रूढीपरंपरा, व्रतवैकल्य यांनी नटलेली सजलेली आहे. बहिण भावांच नातं अधिक घट्ट विणणारा प्रेमाचा धागा असलेला सण रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात परंपरेनुसार आळंदीसह राज्यात साजरा करण्यात आला.  श्री संत परंपरेतील संत मुक्ताईने आपल्या संत भावास निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव यांना बालपणात बांधणारी राखीची अतुट प्रेमाचे बंधनाची परंपरा श्री संत मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगरने आजही सांभाळली आहे. या उपक्रमाचा भाग श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीवर राखी स्पर्शित करून बांधली.
रक्षाबंधन दिना निमित्त संत मुक्ताबाई संस्थान, मुक्ताईनगरचे अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील यांनी विश्वस्त प्रतिनीधी पाठवून त्र्यंबकेश्वर, आळंदी, सासवड, आपेगाव या समाधी स्थळावर जावून तिन्ही बंधूना राखी बांधण्यात आली.  रक्षाबंधन दिनाचे पर्वावर संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी येथे मुक्ताई संस्थानचे विश्वस्त संदिप पाटील, अंकिता पाटील यांनी मुक्ताईची राखी विधीवत पूजनाने माऊलींना संजीवन समाधीवर अर्पण करीत बांधली.  यावेळी माऊलींचे पुजारी श्री योगेश महाराज चौधरी, श्री ह भ प सागर महाराज लाहुडकर,आळंदी देवस्थान कमिटी व्यवस्थापक ज्ञानेश्वर विर व भाविक उपस्थित होते.  श्री संत मुक्ताबाई संस्थान आळंदी शाखेचे व्यवस्थापक गजानन महाराज लाहुडकर म्हणाले अनेक वर्षांपासून आळंदी मंदिरात दरवर्षी उपक्रम राबविला जात आहे.

Share This Article
Exit mobile version