– रायपूर येथे मोठा पोलिस फौजफाटा तैनात; रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरूच!
चिखली/बुलढाणा (महेंद्र हिवाळे/सुरेश हुसे) – बुलढाणा तालुक्यातील रायपूर गावातील खंडागळे हॉस्पिटलवर जिल्हा शल्य चिकित्सकांनी टाकलेल्या छाप्यात बोगस डॉक्टर उज्वल खंडागळे याला अवैध गर्भपात प्रकरणी रंगेहाथ पकडण्यात आले. शल्यचिकित्सकांच्या या पथकासह कारवाईने तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. खंडागळे याचा बर्याच वर्षांपासून हा गोरखधंदा सुरू असल्याची चर्चा रंगली होती. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत कारवाईच सुरूच होती, तसेच रायपूर येथे मोठा पोलिस फौजफाटा तैनात होता. दरम्यान, याबाबतची अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती.
ही कारवाई बुलढाणा जिल्ह्यातील अलीकडच्या काळातील सर्वात मोठी कारवाई मानली जात असून, डॉ. खंडागळे किती वर्षांपासून हा गैरप्रकार करत होते, याचा तपास सध्या वैद्यकीय पथक आणि पोलिसांकडून सुरू आहे. याप्रकरणी लवकरच आणखी खुलासे समोर येण्याची शक्यता आहे. छाप्यादरम्यान रायपूर येथे मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. रात्री उशिरापर्यंत तपास आणि कारवाई सुरूच होती.
अवैध गर्भपात प्रकरणाशी संबंधित तपासणीदरम्यान आमच्या हॉस्पिटलवर छापा टाकण्यात आला होता. परंतु सर्व संबंधित शासकीय कागदपत्रांची व तपास यंत्रणांची पडताळणी झाल्यानंतर माझ्या हॉस्पिटलला पूर्णपणे निर्दोष घोषित करण्यात आले आहे. आमच्याकडून कोणतीही नियमभंगाची कृती झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. माझे वडील, डॉ. प्रकाश खंडागळे यांनी एक आयुष्यभर गरिब-गरजू रुग्णांची सेवा केली. त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्हीही हॉस्पिटलमध्ये आजपर्यंत अनेकांना सवलतीत किंवा विनामूल्य उपचार दिले आहेत, आणि ही सेवा यापुढेही सुरूच राहणार आहे.
– डॉ. तुषार खंडागळे, खंडागळे हॉस्पिटल, रायपूर, बुलढाणा

