मेहकर मतदारसंघातील रस्ते गेले खड्ड्यांत!

editor 1 Min Read
1 Min Read

मेहकर (शिवशंकर तांगडे) – मेहकर-लोणार मतदारसंघातील राजकारण जोरात असले तरी, या मतदारसंघातील रस्त्यांच्या दुरवस्थेकडे मात्र लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील जयताळा, बरटाळा, शिवपुरी, पारडा, बदनापूर या गावांचे रस्ते खराब झाले असून, खड्ड्यांत रस्ते की रस्त्यात खड्डा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शिवसेनेअंतर्गतच्या गटबाजीने मेहकर मतदारसंघ गाजतो आहे. परंतु, या राजकीय प्रश्नांत खराब झालेले रस्ते, रस्त्यांवर पडलेले खड्डे या गंभीर प्रश्नाकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. या तालुक्यातील जयताळा, बरटाळा, शिवपुरी, पारडा, बदनापूर या गावांच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे. या रस्त्यावरून प्रवास करणे कठीण झाले असून, पाण्या-पावसाच्या दिवसांत छोटे मोठे अपघात तर नेहमीचेच झालेले आहे. त्यामुळे तालुक्याच्या लोकप्रतिनिधीने या रस्त्यांची दुरवस्था तातडीने दूर करावी, अशी मागणी या भागातील नागरिक करत आहेत. मेहकर ते त्यामार्गे प्रवासासाठी लागणारे सर्वच रस्ते असेच खराब झालेले असून, लोकप्रतिनिधींनी थोडे राजकारणापलिकडे जावून रस्त्यांची दुरवस्था दूर करावी, अशी मागणी जोरात होत आहे.
——————–

Share This Article
Exit mobile version