नंदुरबार परिसरात २४ तासात ४८ मिलिमीटर पावसाची नोंद

editor 1 Min Read
1 Min Read

नंदूरबार (जिल्हा प्रतिनिधी) – गेल्या दोन दिवसापासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून गेल्या २४ तासात नंदुरबारसह परिसरात ४८ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. पुढील ४८ तास जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याच्या वतीने व्यक्त करण्यात आले आहे.

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाने हजेरी लावली असून पावसाची रिपरिप सुरू आहे.  काही भागात जोरदार पाऊस झाल्याने बळीराजा समाधानी आहे.  पावसामुळे पिकांना फायदा झाला आहे तर दुसरीकडे काही ठिकाणी शेतामध्ये पाणी साठल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती ही समोर येत आहे.  नंदुरबार तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात जोरदार पाऊस झाल्याने वीरचक्र धरणाच्या पातळीत वाढ होत असून धरणातून पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Share This Article
Exit mobile version