– कृषी दिनाचे औचित्य साधून विविध जातीच्या वृक्षांचे झाले रोपण
चिखली (महेंद्र हिवाळे) – भारतीय स्टेट बँक स्थापन होऊन १ जुलै २०२५ रोजी ७० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त तसेच, १ जुलै रोजी अमडापूर भारतीय स्टेट बँक शाखा मॅनेजर रमेश करमकर यांच्या पुढाकाराने बँक इमारतीच्या समोर कृषी दिनाचे औचित्य साधून रातराणी, जुई, परिजातक, अपोली फायकस, ग्रीन फायकस, सोनचाफा, पांढरा चाफा अशा आठ प्रकारच्या वृक्षांचे रोपण व वृक्ष संवर्धनाची जबाबदारी घेण्यात आली. त्यानंतर बँकेच्या कार्यालयामध्ये सरपंच सौ. वैशालीताई संजय गवई व मॅनेजर करमकर यांच्याहस्ते केक कापून ७० वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
यावेळी या कार्यक्रमाला परिसरातील असंख्य ग्राहक उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये इमारतीसमोर विविध जातींच्या कलमाची लागवड करण्यात आली. त्यानंतर कार्यालयामध्ये केक कापून ७० वा वर्धापन दिन साजरा करण्यात त्यानंतर बँकेच्यावतीने उपस्थित त्यांना नाश्ता फराळ पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर कार्यक्रमाचा समारोप झाला. यावेळी कार्यक्रमाला अमडापूर सरपंच सौ. वैशालीताई संजय गवई, शाखा व्यवस्थापक रमेश करमकर त्यांचे सहकारी राकेश जांभुळकर, नामदेव जाधव, सतीश भराड, सुशांत इंगळे, नितीन पाटील, श्याम बोराडे, शंकर बोराडे, अस्मिता हिवाळे, श्रुती देशमुख गावातील प्रसाद देशमुख, गाझी बाबा, बाबुराव सोनुने, राम जाधव, बबनराव राऊत, श्याम जुमडे, प्रताप कौसे, वसंतराव झांजुर्णे, पत्रकार माधव धुंदाळे, कैलास देशमुख, असंख्य शेतकरी, ग्राहक सेवा केंद्र, खातेधारक उपस्थित होते.

