‘आमच्या मम्मीला शोधून द्या हो’; चिमुकल्यांची आर्त हाक!

admin 2 Min Read
2 Min Read

– बेलगाव येथील पोटात गोळा उठवणारी बातमी
– गावातील महिलांनी सोबत नेली; परंतु घरी परत न आणल्याने घातपाताचा संशय!

मेहकर (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील ग्राम बेलगाव येथील ४२ वर्षीय विवाहिता सौ.वंदना अशोक साबळे ही गावातीलच काही लोकांच्या सोबत वाशीम येथे आजारी नातेवाईक यांना भेटायला जाते म्हणून २२ जूनरोजी घरी सांगून गेली. तिची परत येण्याची वाट बघत असलेल्या ८ वर्षीय मुलगी आणि १५ वर्षीय मुलगा हा सोबत जाणार्‍याच्या घरी चकरा मारत माझी आई कुठे आहे? असे विचारत आहे. पण सोबत असलेल्या महिला ह्या त्या मुलांना पाहून दरवाजा लावून घेतात, अशी माहिती दि. २९ जून रोजी मुलांनी दिली व त्या सध्या आता गावातून गायब आहेत.

बेलगाव येथील सौ.वंदना अशोक साबळे वय ४२ वर्षे ही महिला २२ जूनला घरी असतांना तिला बोलावण्यासाठी शेजारी राहत असलेली रंजना इंगळे ही महिला घरी आली व तिचे कोणीतरी नातेवाईक हे वाशीम येथे आजारी आहेत. त्यांना पाहण्यासाठी जायचं म्हणून तिने वंदना साबळे हिला सोबत घेतले. त्या वेळी सौ.वंदना साबळे हिचे पती अशोक साबळे शेतात कामाला गेलेले होते. तर मुलगी कु.मयुरी वय ८ वर्षे, मुलगा पंकज साबळे वय १५ वर्षे यांनी विचारले असता, संध्याकाळपर्यंत परत येतो असे सांगत गावातीलच संजय इंगळे, मीना लक्ष्मण गिर्‍हे यांच्यासोबत गेली. संध्याकाळी वंदना वगळता सर्व जण परत आले. त्यावर पती अशोक साबळे यांनी डोणगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असता, हरवल्याचे प्रकरण दाखल झाले असता, सोबत जाणारे गावातून गायब असल्याचे सांगण्यात येत आहे. यावरून हा घातपात तर नसेल ना! असा संशय गावकर्‍यांनी व्यक्त केला आहे. तसेच आमच्या आईला लवकरात लवकर शोधून द्या, अशा प्रकारची आर्त हाक चिमुकल्यांनी दिली आहे.

Share This Article
Exit mobile version