शेतीच्या वादातून पुतण्याने काकू व चुलत भावाचा कुर्‍हाडीने वार करून केला खून

admin 2 Min Read
2 Min Read

– आरोपींनेही विष घेत केली आत्महत्या; वर्धा जिल्ह्यातील घटना; निमसडा गाव हादरले!

वर्धा (प्रकाश कथले) – हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्‍या निमसडा येथे शेतीच्या वादातून काकू तसेच चुलत भावाचा कुर्‍हाडीने डोक्यावर वार करून खून करण्याची धक्कादायक घटना घडली. त्यानंतर आरोपीनेही विष घेतले. त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. आजच्या या घटनेने निमसडा गाव आणि परिसर हादरला आहे.

आज सकाळी नऊ वाजेदरम्यान शेतीच्या वादावरून सख्या पुतण्याने काकू व चुलत भावाची शेतामध्ये कुर्‍हाडीने डोक्यावर वार करून दोघांनाही ठार केले. आरोपी महिंद्रा भाऊराव मोहिते वय ५६ वर्ष राहणार निमसडा यांने शेतामध्ये पेरणीच्या वादातून सख्या काकू साधना सुभाष मोहिते वय ५५ वर्ष व सखा चुलत भाऊ नितीन सुभाष मोहिते वय २७ वर्ष रा.(निमसडा) या दोघांनाही शेतामध्ये शेतीच्या पेरणीच्या वादावरून आरोपी महिंद्रा भाऊराव मोहिते यांने डोक्यावर कुर्‍हाडीचे वार करून दोघांना ठार केले. हत्त्येची माहिती परिसरात होताच आलोडा, बोरगाव टाकळी, पाथर्डी येथील नागरिकांनी शेतात गर्दी केली होती. या घटनेची माहिती अल्लीपूर येथील ठाणेदार विजय घुले यांना मिळताच त्यांनी पोलिस अधीक्षक अनुराग जैन, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत घटनास्थळी सहकार्‍यांसोबत जात पंचनामा केला. नंतर मृतदेह शवविच्छेदनाकरीता वर्धा येथील शासकीय रुग्णालयामध्ये पाठविले. शेतामध्ये ही घटना घडल्यानंतर आरोपी महेंद्र भाऊराव मोहिते याने शेतामध्ये ठेवून असलेले विष प्राशन केले. त्याला उपचाराकरता सेवाग्राम हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचासुद्धा मृत्यू झाला. या प्रकरणाचा पुढील तपास अल्लीपूर येथील ठाणेदार विजय घुले करीत आहे.

Share This Article
Exit mobile version