सैनिक कल्याण निधीसाठी १ लाख ८५ हजाराची मदत

editor 1 Min Read
1 Min Read

नंदूरबार (जिल्हा प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, विभाग शहादा कार्यालयामार्फत जिल्हा सैनिक कल्याण निधीस १ लाख ८५ हजार २०० रुपयांची मदतीचा धनादेश कार्यकारी अभियंता  व्ही.एस.बागूल यांच्यावतीने कार्यालयातील लिपिक सुभाष वळवी यांच्या हस्ते ध्वजनिधी संकलनाचा धनादेश अपर जिल्हाधिकारी महेश पाटील यांच्याकडे सुपूर्द केला.  यावेळी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे कल्याण संघटक सुभेदार मेजर रामदास पाटील उपस्थित होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी श्री.पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा,  महाविद्यालये,  शासकीय,  निमशासकीय कार्यालय प्रमुखांनी तसेच कर्मचा-यांनी सैनिक कल्याण निधीस सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन केले.

Share This Article
Exit mobile version