वारसास अपघाती विम्याचा एक लाखाचा धनादेश वितरित!

admin 1 Min Read
1 Min Read

– राजर्षी शाहू मल्टिस्टेटचा पुढाकार; रस्ता अपघातात झाला होता खातेदाराचा मृत्यू!

बुलढाणा (राजेश लोखंडे) – रस्ता अपघातात मृत्यू झालेल्या खातेदाराच्या वारसास राजर्षी शाहू मल्टिस्टेट को- ऑप. क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष संदीप शेळके यांच्याहस्ते अपघाती विम्याचा एक लाख रुपयाचा धनादेश वितरित करण्यात आला.

संस्थापक अध्यक्ष संदीप शेळके, संस्थाध्यक्षा मालतीताई शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने सर्व खातेदारांचा केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनीकडून एक लाखाचा अपघाती विमा काढलेला आहे. चिखली येथील खातेदार अविनाश सपकाळ यांचा १८ जानेवारी रोजी चिखली- मेहकर रोडवर अपघातामध्ये मृत्यू झाला. एक्सपेरिटस इन्शुरन्स कंपनीकडून काढलेल्या अपघात विम्याची एक लाख रुपये रक्कम केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी हितेश ठक्कर प्रयत्न करुन दावा मंजूर करून घेतला. मयत खातेदाराची पत्नी श्रीमती कल्पना सपकाळ यांना विम्याच्या रकमेचा धनादेश वितरित करण्यात आला. यावेळी सरव्यवस्थापक दिलीप चव्हाण, विमा कर्मचारी अक्षय इंगळे उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version