धुळ्यात काँग्रेसची आझादी गौरव पदयात्रा!

editor 1 Min Read
1 Min Read

धुळे (ब्युरो चीफ) – देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. देशाची एकता, अखंडता टिकवण्यासाठी माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी, राजीव गांधी यांना आपले रक्त सांडावे लागले. स्वातंत्र्याच्या संग्रामात लढणार्‍या सैनिकांना वंदन करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्यावतीने काढण्यात आलेल्या आझादी गौरव पदयात्रेत आज राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे धुळे येथे उपस्थित झाले होते.
धुळे तालुक्यातील कापडणे गावाला स्वातंत्र्य सैनिकांचा मोठा इतिहास आहे. धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, माजी मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होत, कापडणे येथून निघालेल्या पदयात्रेचा समारोप सोनगीर येथे स्वतंत्र सैनिकांच्या कुटुंबाचा सन्मान करून करण्यात आला. यावेळी जिल्हाभारतील काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version