स्वातंत्र्याच्या अमृत महाेत्सवानिमित्त आज कृतज्ञता फेरी

editor 1 Min Read
1 Min Read

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील उपविभागीय अधिकारी हवेली अंतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय कार्यालयांच्या सहकार्याने बुधवारी ( दि.१० ) सकाळी साडेसात वाजता मामलेदार कचेरीत आद्यक्रांतिवीर हुतात्मा उमाजी नाईक स्मारकाला वंदन करून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षा निमित्त आयोजित केलेल्या कृतज्ञता प्रभात फेरी सुरु होणार आहे.  अशी माहिती हवेली तहसीलदार तृप्ती कोलते यांनी दिली आहे.

कृतज्ञता प्रभात फेरी साठी उमाजी नाईक स्मारक खडक माळआळी शुक्रवार पेठ येथे उपस्थित रहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  या कृतज्ञता रॅलीचा मार्ग उमाजी नाईक स्मारक, राष्ट्र भूषण चौक, घोरपडे पेठ पोलीस चौकी, दलाल पान शॉप, महात्मा फुले स्मारक, लोहिया नगर सरळ सोनावणे हॉस्पिटल मार्गे मल्लिका पासून पुढे जुना मोटर स्टँड, पद्मजी पोलिस चौकी, क्वार्टर गेट, शांताई हॉटेल मार्गे, लाल देऊळ, नवीन जिल्हा परिषद मार्गे ब्लू नाईल हॉटेल मार्गे, विधान भवन असा मार्ग रहाणार आहे. या कार्यक्रमात स्वातंत्र्य संग्रामातील बलिदान करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या बलिदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रॅली आयोजित करण्यात आली आहे. भारतीय नागरिक या नात्याने स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदान प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यास पाऊस असला तरी नागरिकांनी आपला बहुमूल्य वेळ या प्रभात फेरी साठी द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

Share This Article
Exit mobile version